अनुवाद

ऐतिहासिक वारसा ........


कास्य हा धातू फक्त सुवर्ण किंवा रौप्य या पदाकांबरोबरच कास्य पदक म्हणुन आपल्याला माहित आहे.भारतात बहुतेक सर्वच प्रांतातून लग्नामध्ये मुलीला काश्याची वाटी देण्याची प्रथा दिसून येते . पण तिचा उपयोग मात्र क्वाचितच केला जातो. कासे हा तांबे आणि जस्त या मूलाधातूंचा सम्मिश्र धातू असून आयुर्वेदाने त्याचा उपयोग शरीरातील ऊष्णता कमी करण्यासाठी ५००० वर्षापासून सांगीतला आहे. गाईचे तूप काश्याच्या (च ) वाटीने तळपायास हळुवारपणे चोळल्यास झोप चांगली लागते. गुजरातमध्ये तर जेवण्यासाठी काश्याच्या थाळ्याच वापरतात. पुजेसाठी काश्याचे तबक वापरले जाते. मंजूळ आवाजासाठी मंदिरातल्या घंटांसाठीहि कासे वापरले जाते. तसेच काठीण्य आणि ऑक्सीडेशन न होण्याच्या गुणधर्मामुळे तोफा बानविण्यासाठी हा धातु वापरला जात असे. पूर्वी राशियामध्ये चर्चघंटा तर स्पेन आणि पोर्तुगालमध्ये तोफा या धातुपासून बनवित असत.

आपल्याकडे वाट्या , थाळ्या आणि झांजा बनविण्यासाठी कासे वापरले जाते. आणि बरेचवेळा काश्याची वाटी म्हणून पितळेची वाटी खपवली जाते. कारण दोघांचाहि रंग जवळजवळ सारखाच दिसतो. आपल्याकडे आयुर्वेदावरील ग्रंथांमध्ये " पादाभ्यङ्ग " सांगितलेले आहे. त्यात काश्याच्या वाटीने तळपायाला गाईचे तूप चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे. त्याचे फायदे असे आहेत : १. गोंधळलेले व त्रस्त मन शांत होते. २. ताणतणाव कमी होतात. ३. आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढते. ४. दृष्टी आणि कानाची क्षमता चांगली राहते. ५. चांगली व गुणवत्तापूर्ण झोप लागते. ६. त्वचा तजेलदार आणि तेज:पुंज होते. ७. तळपायाच्या भेगा कमी होतात आणि पाय सुंदर दिसतात . भावप्रकाश नांवाच्या ग्रंथात तर म्हंटले आहे “ कास्यं बुद्धिवर्धकम ” आपल्या मराठीत एक म्हण आहे -- --तळ पायाची आग मस्तकात जाणे -- -आणि ती अक्षरश: खरी आहे तळपायाला काश्याच्या वाटीने तूप चोळल्याने डोके शान्त का होते याचे उत्तरच या म्हणीत सापडते . त्वचेच्या बाबतीत म्हणाल तर कोणत्याही सौंदर्य साबणापेक्षा हा उपाय नक्कीच चांगले परीणाम आपल्याला दाखवील. आपले शरीर कफ वात आणि पित्त या तीन दोषांचे बनलेले आहे आणि या त्रिदोषांचा तोल गाईचे तूप काश्याच्या वाटीने तळपायास चोळल्याने संभाळला जातो.. वात -- जो अनेक रोगांचे मूळ आहे -त्याचे शमन करून मर्यादित ठेवण्यासाठी हा उपचार अतिशय परिणामकारक असल्याचे अनुभवास आले अहे. युरोप आणि अमेरिकेत तर भरपूर पैसे मोजून लोक ही ट्रीटमेन्ट घेत असतात. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे ज्यात म्हंटल आहे "जो मनुष्य झोपण्यापूर्वी पायांना मसाज करतो त्याच्यापासून रोग दूर राहतात जसे की गरुडपासून साप दूर राहतात." आपल्या शरीरांत ७२००० नाड्या आहेत त्यातल्या बऱ्याच नाड्यांचा शेवट हात आणि पायाच्या तळव्यात होतो. त्यामुळे तळव्याना मसाज हा अनेक दुखण्यांवराचा एक कमी खर्चाचा पण गुणकारी उपाय आहे. पण साधा उपाय लोक का वापरत नाहीत ? वापरतात ! पण केवळ मोठमोठ्या वैद्यांनी खूप पैसे घेऊन सांगितल्यानंतर ! किंवा दुसऱ्या कोणीतरी आयता करून दिला तर ! पूर्वी पत्नी पतीच्या पायाला असा झोपताना मसाज करून देत असे किंवा सुना सासु-सासऱ्यांच्या पायाला करून देत असत. पण आता एवढा वेळच कुणाकडे नाही आणि हे काम कुणाला सांगावे असेही कोणास वाटत नाही. तरी पण ज्यांना शक्य असेल त्यांनी हे अवश्य करावे व दुखण्यांपासून दूर रहावे.

आयुष्मान एक वरदान ........


वातव्यधिहरम कफप्रशनम कान्तीप्रसादावहम त्वग्वैवर्ण्य विनाशनमं रुचिकरमं सर्वांग दार्ढ्यप्रदम , अग्नेर्दिप्तिकरमं बलोपजननं प्रस्वेद मेदोप महं पदभ्यां मर्दनमुदिशन्ति मुनय: श्रेष्ठं सदा प्राणिनाम . ………म्हणजे ऋषि -मुनी सांगतात की पायाला तेल किंवा तुपाने मसाज करणे कफनाशक आहे , सुवर्णासमान कांती प्रदान करणारे , त्वचेचा वर्ण गौर करणारे ,अग्नि प्रदीप्त करणारे , बलकारक ,मेद- स्वेद ( घाम ) कमी करणारे , आणि रुचिकारक आहे . मग हा साधा उपाय लोक का वापरत नाहीत ? वापरतात ! पण केवळ मोठमोठ्या वैद्यांनी खूप पैसे घेऊन सांगितल्यानंतर ! किंवा दुसऱ्या कोणीतरी आयता करून दिला तर ! पूर्वी पत्नी पतीच्या पायाला असा झोपताना मसाज करून देत असे किंवा सुना सासु-सासऱ्यांच्या पायाला करून देत असत. पण आता एवढा वेळच कुणाकडे नाही आणि हे काम कुणाला सांगावे असेही कोणास वाटत नाही.

हा उपचार करता यावा म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत "आयुष्मान फूट मसाजर " . ह्या साध्याशा मशीनमध्ये एक काश्याची डिश इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने फिरती ठेवली जाते ज्यावर थोडसं गाईचं तूप टाकायचं आणि पाय ठेऊन आरामात बसायचं . १०/१५ मिनिटं असं तळव्याला तूप चोळायचं ,नंतर काळा झालेला तळवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आणि झोपायचं . बघा कशी शांत झोप लागते आणि कसे ताजे तवाने होऊन सकाळी उठतां तुम्ही ! या मशीनला अगदी कमी म्हणजे एका ट्युबलाईटएवढी वीज लागते . आणि बाकी काही खर्च नाही . डॉक्टरची बिलं मात्र कमी होतील हे मशीन भारतातच नाही तर जगात पहिल्यांदा आम्ही बनविलेले आहे .

© 2016 Novella Industries. All rights reserved | Design by OdinByte